वृत्तसंस्था, नवी दिल्ली
गुजरात विधानसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधलाय. गुजरातमध्ये भाजपला जोरदार झटका बसलाय.
गुजरातमधील जनतेला मोदींचं विकास मॉडेल मान्य नाही. तसंच नोटाबंदी, जीएसटी आणि भ्रष्टाचाराबाबत बोलणाऱ्या मोदींच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न उपस्थित झालाय, असं राहुल गांधींनी म्हटलंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.