कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज उत्तर प्रदेशाच्या अमेठीतून उमेदवारी अर्ज भरला. या मतदारसंघातून राहुल गांधी चौथ्यांदा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत. राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपाच्या नेत्या स्मृती इराणी निवडणूक लढवणार आहेत. राहुल गांधी यावेळी दोन मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. राहुल गांधी यांनी केरळच्या वायनाड येथून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दोन ठिकाणाहून निवडणूक लढवणार आहे.
उत्तर प्रदेशमधील अमेठी हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे.
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशाच्या अमेठीतून उमेदवारी अर्ज भरला.
अर्ज दाखल करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी रोड शो करत शक्तिप्रदर्शन केले.
प्रियांका गांधी वाड्रा, रॉबर्ट वाड्रा आणि त्यांची मुलंसोबत आली होती.
वायनाड येथूनही राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
तसेच राहुल गांधी अर्ज दाखल करताना सोनिया गांधी सुद्धा त्यांच्यासह उपस्थित होत्या.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.