वृत्तसंस्था, नवी दिल्ली
काँग्रेसच्या अध्यक्षपदी लवकरच रुजू होण्याच्या तयारीत असलेले राहुल गांधी स्वत:च्या ट्विटर हँडलचं नाव बदलणार असल्याची शक्यता आहे.
2014 या निवडणुकीत पराभवानंतर काँग्रेसने कंबर कसलीय. मोदी सरकारच्या अनेक निर्णयावर त्यांनी ताशेरे ओढायलाही सुरुवात केलीय.
सोशल मीडियातही ते सक्रिय झाले आहेत. नोटाबंदी, सर्जिकल स्ट्राइक, जीएसटीसारख्या मुद्द्यांवरून ते सरकारवर करत असलेल्या टीकेला नेटीझन्सचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
सोशल नेटवर्किंग साइटवर नरेंद्र मोदी यांना 3 कोटी 55 लाख लोक फॉलो करतात. तर, राहुल यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या केवळ 38 लाख 8 हजार आहे. मोदींना टक्कर द्यायची असल्यास हे चित्र बदलावं लागणार असल्याची जाणीव काँग्रेसजणांना आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.