नागपूरमधील लांच्छनास्पद ‘रॅगिंग प्रकार’ उघडकिस

नागपूरमधील लांच्छनास्पद ‘रॅगिंग प्रकार’ उघडकिस

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 रॅगिंग रोखण्यासाठी जाहिरात किंवा अन्य प्रसार माध्यमातून खूप प्रयत्न केले जात असून देखील हे प्रकार थांबले जात नाहीत, याचीच खंत वाटते. नुकताच नागपूरचा लांच्छनास्पद  रॅगिंग प्रकार उघडकिस आला.

नागपूरमधील, 21 वर्षीय विद्यार्थ्याला बळजबरीने मूत्र पाजण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून, अजनी पोलिसांनी रॅगिंग प्रकरणी 8 विद्यार्थ्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पीडित विद्यार्थी हा 21 वर्षीय असून तो श्री आयुर्वेदिक महाविद्यालया बीएएमएस शिकत आहे. आदिवासी मुलांच्या वसतिगृहात तो राहत असून, 21 फेब्रुवारीच्या रात्री पीडित विद्यार्थी त्याच्या खोलीत अभ्यास करत होता. एका विद्यार्थ्याने त्याला 205 क्रमांकाच्या खोलीत बोलावले. आठ विद्यार्थ्यांनी त्याला घेरले आणि जबरदस्तीने  निरवस्त्र करून त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याला मूत्र पाजून त्याच्या अंगावर मुत्रविसर्जित केले आणि विषारी औषध पाजले. त्यानंतर पीडित विद्यार्थी बेशुद्ध झाला. विद्यार्थ्यांंनी घाबरून त्याला मेडिकल कॉलेज हॉस्पिटल मध्ये दाखल केले.

पीडित विद्यार्थ्याच्या नातेवाईकांना माहिती मिळताच त्यांनी पीडित विद्यार्थ्याला खासगी रूगणालयात दाखल केले. पीडित विद्यार्थीच्या आई-वडिलांना घडलेला प्रकार समजताच त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. अजनी पोलिसांनी बुधवारी त्यांचे बयाण घेतले. रॅगिंग आणि जबरदस्तीने विषारी औषध पाजण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विद्यार्थ्यावर उपचार सुरू आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version