रॅगिंग प्रकरणी 5 विद्यार्थिनींना वस्तिगृहातून काढले

रॅगिंग प्रकरणी 5 विद्यार्थिनींना वस्तिगृहातून काढले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

रॅगिंग करणं हा गुन्हा असताना देखील विद्यार्थी याप्रकाराला बळी पडतात. अमरावतीत असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अमरावतीमधल्या शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेच्या मुलींच्या वस्तिगृहात काही ज्यूनियर मुलींची रॅगिंग करण्यात आली.

 

 

याप्रकरणी पाच विद्यार्थीनींना वस्तिगृहातून काढून टाकण्यात आलं आहे. घडलेल्या प्रकारने पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.  

वस्तिगृहातील दोन विद्यार्थीनींच्याच गटातील हा प्रकार समोर येताच खळबळ उडाली आहे.

 

 

संस्थेच्या संचालक डॉ अर्चना नेरकर यांनी कारवाई करुन विद्यार्थीनींना वस्तिगृहातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. 

रॅगिंगच्या घटना या वारंवार घडतांना दिसतात. या प्रकाराला आळा घालणं हे खूप महत्त्वाचं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version