जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राज्य सरकारने जाहीर केलेल्या 34 हजार कोटींच्या शेतकरी कर्जमाफीचा सुकाणू समितीने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला असून, दीड लाखांची कर्जमाफी फसवी असल्याची
टीका शेतकरी नेते रघुनाथदादा पाटलांनी केली.
सरसकट संपूर्ण कर्जमाफीवर सुकाणू समिती ठाम असून, राज्य सरकारच्या कर्जमाफी घोषणेविरोधात 9 जुलैपासून पुन्हा एकदा संघर्ष यात्रेला सुरुवात करण्यात येणार
असल्याची माहिती सुकाणू समिती सदस्य डॉ. अजित नवलेंनी दिली.
तसेच 23 जुलै रोजी पुण्यात या संघर्ष यात्रेची सांगता होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.