जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
सरकारी अधिकाऱ्यांकडून आता स्वत:च्या बचावासाठी माहिती अधिकाराचा वापर करण्यात येऊ लागलाय. वादग्रस्त मोपलवारांनी माहिती अधिकाराचा वापर करुन वादग्रस्त भूखंडाची माहिती मिळवलीय.
गेल्या काही महिन्यांपूर्वी एक वादग्रस्त क्लिप व्हायरल झाली होती. त्या क्लिपमधील संभाषणात जाल मेहतांचाही उल्लेख होता. मात्र, आता मोपलवारांनी मिळवलेल्या माहितीत जाल मेहतांनी भूखंडासाठी अर्ज केला नसल्याचं उघड झालंय
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.