वादग्रस्त स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु राधे माँ ला बोरीवलीच्या सत्र न्यायालयाचा जोरदार झटका

वादग्रस्त स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु राधे माँ ला बोरीवलीच्या सत्र न्यायालयाचा जोरदार झटका

वृत्तसंस्था, मुंबई

 

वादग्रस्त स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु राधे माँ ला बोरीवलीच्या सत्र न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. 

 

घरगुती हिंसाचाराच्या खटल्यातून नाव वगळण्यात यावे यासाठी तिने केलेला विनंती अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

 

2 वर्षांपूर्वी राधे माँ विरोधात एका महिलेने हा खटला दाखल केला होता. 2015 मध्ये एका 32 वर्षांच्या महिलेने सासरची मंडळी आणि राधे माँ विरोधात हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली होती.

 

माझ्या सासरकडील मंडळींना राधे माँ ने माझ्याविरोधात भडकवले असल्याची तक्रार या महिलेनं केली होती. तिची तक्रार दाखल करत पोलिसांनी राधे माँ ची चौकशीही केली होती.

 

या खटल्यातून आपले नाव वगळण्यात यावे यासाठी राधे माँ ने न्यायालयाकडे विनंती अर्ज केला होता. मात्र, सत्र न्यायालयाने जोरदार झटका देत राधे माँ चा विनंती अर्ज फेटाळला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version