जो गरजते हैं वो कभी बरसते नही, हेच खरे! – राधाकृष्ण विखे पाटील

जो गरजते हैं वो कभी बरसते नही, हेच खरे! – राधाकृष्ण विखे पाटील

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएला रामराम ठोकल्याच्या मुद्द्यावरुन राज यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवणारं व्यंगचित्र रेखाटल आहे. ‘स्वाभिमान विरुद्ध स्वाभिमान !’ असे या व्यंगचित्राला नाव दिले आहे.

यावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्रातील स्वाभिमानाच्या स्वयंघोषित ठेकेदारांचे राजीनामे खिशात कुजत पडले असतांना तिकडे तेलुगू देसम आपल्या केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामे देऊन मोकळी झाली आहे. जो गरजते हैं वो कभी बरसते नही, हेच खरे! तसेच, या घटनाक्रमावर राज ठाकरे यांनी काढलेले व्यंगचित्र अत्यंत ‘मार्मिक’ आहे. असे म्हणत त्यांनी राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रचे समर्थन केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version