Ahilyanagar: अहिल्यानगर हादरलं! पिसाळलेल्या कुत्र्याने ४० जणांचा घेतला चावा; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

अहिल्यानगरमध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने ४० जणांना चावा घेतल्यानंतर संताप व्यक्त होत आहे.
Ahilyanagar: अहिल्यानगर हादरलं! पिसाळलेल्या कुत्र्याने ४० जणांचा घेतला चावा; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

अहिल्यानगर शहरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल ४० नागरिकांना चावा घेतल्याची गंभीर घटना समोर आल्यानंतर शहरभर चिंता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाबाबत प्रशासनावरही टीकेची झोड उठत आहे.

या प्रकाराची गंभीर दखल घेत आमदार संग्राम जगताप यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. बैठकीत त्यांनी शहरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा: Ketan Agrawal Case: केतनच्या हत्येचं गुढ सुटता सुटेना! आता तिसऱ्याची एन्ट्री; केतनचा काटा काढला अन् सिया-चेतन पहिले त्याला भेटल

आमदार जगताप यांनी सांगितले की, शहरातील अनेक ठिकाणी उघड्यावर टाकला जाणारा कचरा हा भटक्या प्राण्यांना आकर्षित करतो. त्यामुळे कुत्र्यांचा वावर वाढून नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत आहे. अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांविरोधात दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्याची गरज असल्याचे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले.

महापौर आणि उपमहापौर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत विविध पक्षांच्या नगरसेवकांनीही प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी शहरातील आरोग्य सुविधा, स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरात नियमित आणि प्रभावी स्वच्छता मोहीम राबविण्याची आवश्यकता असल्याचे मत अनेकांनी मांडले.

हेही वाचा :Bengluru Day Care Center: बंगळुरू हादरलं! डे केअर सेंटरमधील अमानुषता; जेट स्प्रेने तोंडावर पाणी मारलं, बाथरूममध्ये कोंडलं अन्…

यावेळी पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या कामांमध्ये अधिक समन्वय राहावा यासाठी प्रत्येक नगरसेवकाच्या स्वाक्षरीसह कामांची नोंद ठेवणारे रजिस्टर तयार करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती मिळाली. यामुळे नागरिकांच्या तक्रारी आणि त्यावर झालेली कार्यवाही याचा नियमित आढावा घेणे सोपे होणार असल्याचे सांगण्यात आले.

याशिवाय, शहरातील स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्यासाठी पिंपरी-चिंचवड आणि नवी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर आउटसोर्सिंग पद्धतीचा विचार करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले. आधुनिक व्यवस्थापन प्रणालीचा अवलंब केल्यास शहरातील मूलभूत सेवांमध्ये सुधारणा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version