अमरावती शहरात आज ‘यांनी’ केली रावणाची पूजा

अमरावती शहरात आज ‘यांनी’ केली रावणाची पूजा

दसऱ्याला सर्वत्र दरवर्षी रावणाचं दहन केलं जातं. मात्र भारतात एक समाज असाही आहे, जो रावणाला दैवत मानून पूजा करतो. महाराष्ट्रातल्याच अमरावती शहरात आज रावणाची पूजा करण्यात आली. आदिवासी गोंड समाजातील लोकांनी शहरातल्या राणी दुर्गावती इथल्या मुख्य चौकात रावणाची विधीवत पूजा करून उत्सव साजरा केला. यावेळी मोठ्या संख्येत आदिवासी समाज उपस्थित होता.

शहरातील राणी दुर्गावती इथल्या मुख्य चौकात आज रावणाची पूजा करण्यात आली. आदिवासी समजातर्फे या पुजेचं आयोजन करण्यात आलं. आदिवासी समाज रावणाला देव मानत असल्याने आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात रावणाच्या पुजेची तयारी करण्यात आली होती. दुपारी 2 वाजता रावण पूजा करण्यात आली.

राम- रावणाच्या संघर्षाला हजारो वर्ष झाली. मात्र रावणाच्या प्रतिमेचं आजही दहन केलं जातं. पण गोंड आदिवासींचं मात्र रावण हे दैवत आहे. रामायणामध्ये रामाची पत्नी सीता हिला पळवणारा अहंकारी राक्षस म्हणून रावणाकडे पाहिलं गेलं असलं, तरी हाच रावण उच्च कोटीचा विद्वानही होता. तसंच तो दशग्रंथी ब्राह्मणही होता. सांस्कृतिक संघर्षामध्ये आपली संस्कृती वाचवण्यासाठी लढणारा नायक म्हणून गोंड आदिवासी रावणाची पूजा करतो.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version