लाच घेताना ‘त्या’ अभियंत्याला रंगेहात पकडले

लाच घेताना ‘त्या’ अभियंत्याला रंगेहात पकडले

जय महाराष्ट्र न्यूज, गोंदिया

 

गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अभियंत्याला लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक पथकानं अटक केली आहे. अशोक राऊत असं या अभियंत्याचे नाव आहे.

 

याबबतचा तक्रारदार हा व्यावसायिक असून काही दिवसांपूर्वी त्याच्याकडे रस्ते दुरुस्तीचं कंत्राट देण्यात आलं होतं. काम पूर्ण झाल्यावर अभियंत्यानं कंत्राट दाराकडून दीड लाखांची मागणी केली होती.

 

मात्र, कंत्राटदाराने त्याला पैसे देण्याला नकार केला होता. त्यानंतर अभियंत्याने त्याच्याकडे पैशांचा तगादा लावला होता. अखेर त्रासलेल्या कंत्राटदारानं अभियंत्याची तक्रार केली. पुढे एसीबी पथकानं सापळा रचत आरोपीला अटक केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version