Pushkar Jog Home Fire : अभिनेता पुष्कर जोगच्या घराला भीषण आग; मुलीसह इमारतीत अडकला आणि…

या आगीमध्ये पुष्करच्या घराचे प्रचंड नुकसान झाले असून, त्याने स्वतः सोशल मीडियाद्वारे या थरारक अनुभवाची माहिती दिली आहे.
Pushkar Jog Home Fire : अभिनेता पुष्कर जोगच्या घराला भीषण आग; मुलीसह इमारतीत अडकला आणि…

Pushkar Jog Home Fire : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पुष्कर जोग याच्या घरावर गुरुवारी मोठ संकट कोसळलं. पुष्कर राहत असलेल्या मुंबईतील इमारतीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीमध्ये पुष्करच्या घराचे प्रचंड नुकसान झाले असून, त्याने स्वतः सोशल मीडियाद्वारे या थरारक अनुभवाची माहिती दिली आहे. सुदैवाने, मुंबई पोलिसांनी वेळेत धाव घेत पुष्कर आणि त्याच्या लहान मुलीला आगीच्या विळख्यातून सुखरूप बाहेर काढले.

आम्ही अडकलोय, वाचवा!   

आग लागल्यानंतर परिसरात धुराचे लोट पसरले होते, ज्यामुळे पुष्करला घराबाहेर पडणे कठीण झाले होते. घाबरलेल्या अवस्थेत त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत मदतीसाठी आवाहन केले होते. ‘माझ्या इमारतीला आग लागली असून मी आणि माझी मुलगी घरात अडकलो आहोत. सगळीकडे आग पसरली आहे, कृपया आम्हाला वाचवा,’ अशा शब्दांत त्याने आपली भीती व्यक्त केली होती.

हेही वाचा – Dhurandhar Box Office Collection: ‘धुरंधर’ची 600 कोटींची मजल; 20 व्या दिवशीही रेकॉर्डब्रेक कमाई

रिअल लाईफ हिरोंनी वाचवले प्राण

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, बीएमसी कर्मचारी आणि मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जीव धोक्यात घालून पोलिसांनी पुष्कर आणि त्याच्या मुलीची सुटका केली. या बचावकार्यानंतर पुष्करने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याच्या घराची झालेली अवस्था स्पष्टपणे दिसत आहे. घरातील फर्निचर आणि अन्य महागड्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत.

पुष्करने मानले प्रशासनाचे आभार

दरम्यान, घर जळून खाक झाले असले तरी, प्राणांवर बेतलेले संकट टळल्याने पुष्करने सुटकेचा निश्वास सोडला आहे. त्याने पोस्टमध्ये म्हटले की, ‘आज अग्निशमन दल, बीएमसी आणि मुंबई पोलीस या खऱ्या नायकांमुळे आम्ही वाचलो आहोत. त्यांचे मनापासून आभार. पण दुर्दैवाने, माझे घर आगीत भस्मसात झाले आहे.’ 

हेही वाचा – Year Ender 2025: सिनेसृष्टीचा चेहरा बदलणारे महत्त्वाचे ट्रेन्ड्स; अँटी-हिरोंची जादू आणि ॲनिमेशनचा वेग ठरला गेमचेंजर

चाहते आणि कलाकारांकडून चिंता व्यक्त

तथापी, पुष्करने घराचा व्हिडिओ शेअर करताच मनोरंजन विश्वातील त्याचे सहकारी आणि चाहत्यांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे. अनेकांनी ‘काळजी घे’ आणि ‘मुलगी सुरक्षित आहे हे महत्त्वाचे’ अशा कमेंट्स करत त्याला धीर दिला आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र या घटनेमुळे पुष्करच्या घराचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version