पुणेकरांसमोर पाणीकपातीचे संकट

खडकवासला प्रकल्पातील चार धरणात मिळून केवळ २३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे, पुणेकरांना पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
पुणेकरांसमोर पाणीकपातीचे संकट

पुणे, १६ मे २०२४, प्रतिनिधी : खडकवासला प्रकल्पातील चार धरणात मिळून केवळ २३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या चार धरणांमध्ये एकूण ६. ७० टीएमसी म्हणजे २३ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे शहराला दोन महिने पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे, पुणेकरांना पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. 

कुठे किती पाणीसाठा शिल्लक ?

खडकवासला – १. २१ टीएमसी.

पानशेत – २. ०२ टीएमसी.

वरसगाव – ३. २८ टीएमसी 

टेमघर  – ०. १९ टीएमसी.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version