पुणे : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात घातपाती कारवायांच्या संभाव्य घटनांच्या अनुषंगाने पोलीस आणि तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यातील कोंढवा भागात मोठी कारवाई केली आहे. या भागात बेकायदेशीर पद्धतीने चालवल्या जात असलेल्या ‘बनावट टेलिफोन एक्सचेंज’चा पर्दाफाश करण्यात आला आहे. या ठिकाणावरुन एकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. एटीएसच्या पथकाने तब्बल ३ हजार ७८८ सीमकार्डसह संत सीम बॉक्स, वायफाय आणि सीमबॉक्स चालवण्याकरिता लागणाऱ्या अँटिना तसेच लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.