जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
पुणे विद्यापीठात इंजिनीअरिंगचा पेपर फुटल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून एक नाही तर तब्बल दहा विषयांचे पेपर परिक्षा होण्यापूर्वीच व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
देशात शैक्षणिक गुणवत्तेत 10 व्या क्रमांकावर असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. सत्र परिक्षेत इंजिनीअरिंग शाखेच्या तब्बल दहा विषयांच्या परिक्षा सुरू होण्याच्या 45 मिनिटे आधीच व्हॉट्सॲपवर व्हायरल झाला. इंजिनीअरिंगच्या या सर्व विषयांच्या पेपरची पाचशे ते हजार रुपयांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.