पुणे रेल्वे स्थानकावर 4 दिवस प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद

प्रवाशांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेत, मध्य रेल्वे प्रशासनाने राज्यातील काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे रेल्वे स्थानकावर 4 दिवस प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद

पुणे : वर्षाअखेरीस होणाऱ्या गर्दीच्या व्यवस्थापनासाठी आणि स्थानक परिसरात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वेने पुणे आणि इतर प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध लावले आहेत. हे निर्बंध २ जानेवारी २०२४ च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.

प्रवाशांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेत, मध्य रेल्वे प्रशासनाने राज्यातील काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पुणे रेल्वे स्थानकासह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल, नागपूर, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, सोलापूर, कलबुर्गी आणि लातूर या स्थानकांचा समावेश आहे.

प्रवाशांची सुरक्षितता आणि गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, स्थानकांवर होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन आणि परिसरातील वर्दळ योग्य पद्धतीने नियंत्रित करण्यासाठी या निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

वयोवृद्ध नागरिक आणि दिव्यांग प्रवाश्यांना मात्र या निर्बंधात सूट दिली आहे, त्यामुळे त्यांना प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळवण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.

रेल्वे प्रशासनाने प्रवाश्यांना सुचवले आहे की, ते आपल्या प्रवासाचे योग्य नियोजन करावेत आणि शक्यतो गर्दी टाळण्याचे प्रयत्न करावेत. प्रशासनाच्या या निर्णयामुळे स्थानकांवर गर्दी कमी होईल आणि प्रवाशांना अधिक सुरक्षित व सुविधाजनक सेवा मिळेल अशी आशा रेल्वे प्रशासनाला आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version