पुणे : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुण्यातील पौड पोलीस ठाण्याच्या पथकाने मनोरमा खेडकरला अटक केली आहे. मनोरमा खेडकरला रायगड जिल्ह्यातील महाडमधील हॉटेलमधून अटक करण्यात आली. शेतकऱ्याला बंदूक दाखवत धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकरवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुण्यातून पळून गेलेल्या मनोरमा खेडकरला पोलीस शोधत होते. अखेर पोलिसांनी महाडच्या हॉटेलमधून मनोरमा खेडकरला अटक केली. पुण्यातील मुळशी येथील धडवली गावात एक भूखंड ताब्यात घेण्यासाठी शेतकऱ्याला बंदूक दाखवत धमकावल्याचा आरोप मनोरमा खेडकरवर आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.