Pune Petrol News: पुणेकरांनो इकडे लक्ष द्या! तुमच्या गाडीत पेट्रोल भरायचे असेल तर ‘या’ वेळेच्या आतच भरा, कारण माहितीये?

कामावरून घरी जाताना, रात्री अचानक पेट्रोल संपल्यावर, किंवा रात्री कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली…तर पुणेकरांना पेट्रोल मिळेल याची हमीच राहणार नाही!
Pune Petrol News: पुणेकरांनो इकडे लक्ष द्या! तुमच्या गाडीत पेट्रोल भरायचे असेल तर ‘या’ वेळेच्या आतच भरा, कारण माहितीये?

पुणे: पुणेकरांसाठी मोठी धडकी भरवणारी बातमी समोर येत आहे. शहरात दररोज हजारो वाहनांची गर्दी असते, आणि त्याच शहरात आता संध्याकाळी सात नंतर पेट्रोल पंप बंद होऊ शकतात, असा इशारा पेट्रोल डीलर्स असोसिएशनने दिला आहे. वाढत्या गुंडगिरीमुळे पंप कर्मचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आल्याने हा निर्णय घेतला जात आहे. म्हणजेच कामावरून घरी जाताना, रात्री अचानक पेट्रोल संपल्यावर, किंवा रात्री कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली…तर पुणेकरांना पेट्रोल मिळेल याची हमीच राहणार नाही!

मागील सात दिवसांत पंप कर्मचाऱ्यांवर तीन हल्ल्यांच्या घटना घडल्या. काही ग्राहकांनी पैशांच्या वादात, काहींनी वाद निर्माण करून प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांवरच हात उचलला. ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने पेट्रोल डीलर्स असोसिएशनने थेट पोलिस आयुक्तांना पत्र पाठवून “दररोज जीव धोक्यात घालून काम करणे शक्य नाही” अशी कठोर भूमिका घेतली आहे. या पत्रात त्यांनी स्पष्ट नमूद केले आहे की “आता कर्मचाऱ्यांचा जीव वाचवायचा की पेट्रोल भरायचं? पोलिस संरक्षण मिळाले नाही तर आम्ही संध्याकाळी 7 नंतर सेवा बंद करू!” ही बातमी पसरताच पुण्यातील वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. आधीच ट्रॅफिक, रोडवर्क्स, धक्कादायक अपघात… आणि आता पेट्रोलचा प्रश्न तर रोजच्या जीवनात धुमाकूळ घालणार आहे.

हेही वाचा: Local Elections Symbols : सफरचंद, बिस्कीट, पाव, केक… अपक्षांना निवडणूक आयोगाकडून 194 मुक्त चिन्हांचं वाटप

असोसिएशनचे प्रवक्ता अली दारूवाला म्हणाले, “गुंडांना आवर घातला नाही तर आम्हालाही कठोर निर्णय घ्यावा लागेल. सात वाजल्यानंतर पेट्रोल मिळणार नाही हे आम्ही पोलिसांना स्पष्ट सांगितले आहे. मात्र पेट्रोल पंप हा अत्यावश्यक सेवा विभाग असल्याने आम्हीही हा निर्णय टाळायचा प्रयत्न करत आहोत. पोलिस आयुक्त आमची समस्या गंभीरतेने घेतील अशी आशा आहे.” दरम्यान पोलिसांकडून वाढीव गस्त, तातडीने कारवाई, तसेच पंप परिसरात सुरक्षा वाढवण्याबाबत उपाययोजनांची चर्चा सुरू आहे.

पुण्यातील पेट्रोल पंप संध्याकाळी 7 नंतर खरोखरच बंद होणार का, की पोलिस आणि पेट्रोल पंप मालक यांच्यात काही तडजोडीचा तोडगा निघणार? वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी सुरक्षितता की नागरिकांची सोय यापैकी कोणाला प्राधान्य दिलं जाणार, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल. पण एक गोष्ट निश्चित… या निर्णयावर संपूर्ण पुणे शहराचे भविष्याचे अवलंबून असल्याने, येणारे दिवस पुणेकरांसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.

हेही वाचा: 

Maharashtra BJP: भाजपची 'सुपरपॉवर टीम' तय्यार; 'हे' आहेत आगामी निवडणुकांचे स्टार प्रचारक

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version