Pune : अंत्यसंस्कारालाही युद्धाच्या झळा! पुण्यातील गॅसच्या तुटवड्यामुळे शवदाहिन्या बंद, आता पारंपरिक पद्धतीने…

पुणे महापालिकेने शहरातील तब्बल 18 गॅस दाहिन्या पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. 
Pune : अंत्यसंस्कारालाही युद्धाच्या झळा! पुण्यातील गॅसच्या तुटवड्यामुळे शवदाहिन्या बंद, आता पारंपरिक पद्धतीने…

जगभरात सध्या इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाचा भडका उडाला आहे. याचा परिणाम संपूर्ण जगभरात दिसून येत आहे. महाराष्ट्रातील पुण्यापर्यंत या युद्धाची झळ पोहोचली आहे. अनेक ठिकाणी इंधन टंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळेच आता पुण्यातील प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.  पुणे महापालिकेने शहरातील तब्बल 18 गॅस दाहिन्या पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार,  व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे महापालिकेने वैकुंठ स्मशानभूमीसह विश्रांतवाडी, कोरेगाव पार्क, औंध, कात्रज आणि हडपसर अशा विविध ठिकाणच्या एकूण 18 गॅस दाहिन्यांचा वापर थांबवला आहे.  या निर्णयामुळे प्रियजनांच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठीही आता पुणेकरांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे.

हेही वाचा – Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहीणींनो आता उरले फक्त 20 दिवस, अन्यथा 1500 रूपये विसरा कारण… 

सध्यातरी पुणेकरांना अंत्यविधीसाठी पारंपरिक पद्धतीचाच आधार घ्यावा लागत आहे. दरम्यान आता अंतिम संस्कारासाठी लाकडी चितेचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे स्मशानभूमीच्या बाहेर रांग लावावी लागत आहे. याबाबत  महापालिकेच्या विद्युत विभागप्रमुख मनीषा शेकटकर यांनी सांगितले की, "गॅसचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतरच या दाहिन्या पुन्हा सुरू केल्या जातील. आम्ही पुरवठादार कंपन्यांशी सातत्याने संपर्क ठेवून आहोत." 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version