जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
पुण्यातील कर्वेनगरमधील वादग्रस्त उड्डाणपुलाचं आज पालकमंत्री गिरीश बापटांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीनं कार्यक्रमावर बहिष्कार घालत पालिकेचा कार्यक्रम भाजपनं हायजॅक केल्याचा आरोप केलाय.
शिवाय यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीत पोस्टरवॉरही पाहायला मिळालं. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना या पुलाच्या कामाला सुरुवात झाली, मात्र काम पूर्ण होईस्तोवर महापालिकेत सत्तांतर झालं आणि श्रेय घेण्यावरून आता राजकारण रंगतेय.
स्थानिक नगसेवकांना विश्वासात न घेता हे उद्घाटन झाल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलाय, तर लवकरच एकत्रित बैठक घेऊन वाद मिटवू, असं सांगत बाजू सावरून नेण्याचा प्रयत्न पालकमंत्री गिरीश बापट यांनी जय महाराष्ट्रशी बोलताना केलाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.