मुठा कॅनलची भिंत रात्री तुटली असती तर…

मुठा कॅनलची भिंत रात्री तुटली असती तर…

जनता वसाहत दांडेकर पूल झोपडपट्टीतील पूल वसाहतीत मुठा कॅनलची संरक्षक भित कोसळल्याने संबंध परिसरात तुडूंब पाणी शिरले. मोठ्या वेगाने आलेल्या या पाण्यामूळे सर्व बांध तोडत सिंहगड रस्त्यावर पाण्याचे लोंढेच्या लोंढे येत होते.

मुठा कॅनलची भिंत रात्री तुटली असती तर…ही कल्पनाच करू शकत नाही. 

हे पाणी दांडेकरवस्ती मध्येही घुसले आणि एकच हाहाकार झाला. त्यामध्येच मुलाची शाळेत जायची वेळ झाली होती. घरात काम करत असलेल्या महिला आपल्या मुलां-बाळांना, वृद्धांना घेऊन बाहेर पडत होते. मात्र या दुर्घटनेत लोकांचा जीव वाचला. पण घरातील होतं नव्हतं ते सगळे एका क्षणात उध्वस्त झाले. घरातले टीव्ही, फ्रीज, कपडे सर्व वाहून गेले. लोकांच्या डोळ्यात पाणीच होते. एका बांधावर उभं राहून फक्त लोकं पाण्याच्या लोंढ्याकडे पाहत होते.

पाणी कमी होण्यासाठी पाटबंधारे विभागाने 1200 क्यूसेकने सुरू असलेलं पाणी बंद केले. मात्र खडकवास ते पुण्यापर्यंतची सहा किलोमीटरचे कॅनलचे अंतर आहे. यातलं सर्व पाणी बंद होण्यासाठी आणखी काही वेळ लागणार आहे. त्यामुळे हे पाणी ओसरल्यानंतर नागरिकांना आपल्या घरात जाता येणार आहे. 

या पूरात अनेकांचे घर देखील वाहून गेलेत. त्यामुळे नागरिकांसमोर मोठं संकट उभे राहिले आहे. काहींच्या घरात अजूनही कमरेपर्यंत पाणी आहे. पाणी ओसरायला खूप वेळ लागणार आहे. मात्र येथील राहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते. यातील अनेक लोक सुखरुप बाहेर निघालेत.

तेथील महापौर मुक्ता टिळक पाहणी करण्यासाठी आल्या असता लोकांनी त्यांना घेराव घातला. महापौरांनी या ठिकाणची पाहणी करून लोकांना मदतीचे आश्वासन दिले आहे. मात्र येथील नागरिक मदतीच्या अपेक्षेत आहेत. याची दखल पाटबंधारे विभाग व महापालिका नागरिकांना मदत करणार का हे पाहावं लागेल. सध्या पाणी थांबलं असून वाहतूक सुरू करण्यात आली आहे.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version