आईवडिलांची गळा चिरल्यानंतर ‘त्याने’ स्वतः च्या हातावर धारदार शस्त्रानं वार करुन घेतले अन्… पुण्याच्या शनिवार पेठेतील धक्कादायक घटना

आईवडिलांची गळा चिरल्यानंतर ‘त्याने’ स्वतः च्या हातावर धारदार शस्त्रानं वार करुन घेतले अन्… पुण्याच्या शनिवार पेठेतील धक्कादायक घटना

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

पुण्यातील शनिवार पेठेत आईवडिलांची निर्घृण हत्या करुन मुलाने स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

प्रकाश दत्तात्रय क्षीरसागर आणि आशा प्रकाश क्षीरसागर अशी हत्या झालेल्या आई वडिलांची नावे आहेत.  ही घटना बुधवारी सकाळी साडे नऊ वाजता उघडकीस आलीये.

पराग प्रकाश क्षीरसागर असे मुलाचे नाव असून त्याने आईवडिलांची गळा चिरुन हत्या केल्यानंतर स्वतः च्या हातावर धारदार शस्त्रानं वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय.

स्थानिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन याची माहिती दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. दरम्यान, विश्रामबाग पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मुलाला ताब्यात घेतलंय. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version