पुण्यात हॉटेलमध्ये तरुणाची धारदार शस्त्रानं वार करून निघृणपणे हत्या

पुण्यात हॉटेलमध्ये तरुणाची धारदार शस्त्रानं वार करून निघृणपणे हत्या

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

पुण्यात हॉटेलमध्ये एका तरुणाची सात ते आठ जणांनी धारदार शस्त्रानं वार करून निघृणपणे हत्या केली.

 

कर्वे नगरमधल्या डोणजे गावातील धक्कादायक घटना आहे. काल संध्याकाळी ही घटना घडली असून हल्लेखोर पसार झाले आहेत.

 

स्वप्नील देशमुख असं हत्या झालेल्या तरुणाच नाव आहे. स्वप्नील आपल्या मित्रासोबत सिंहगड परिसरात फिरायला गेला होता.

 

त्यानंतर डोणजे गावाजवळील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी थांबले होते. दरम्यान तोंडाला रुमाल बांधून आलेल्या सात ते आठ हल्लेखोरांनी हॉटेलमध्ये घुसून

स्वप्नीलवर हल्ला करण्यात आला.

 

ही घटना घडत असताना स्वप्नीलच्या मित्रानं तेथून पळ काढला. तर, या हल्ल्यात स्वप्नील गंभीर जखमी झाल्यानं तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात

आले.

 

मात्र, उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान स्वप्नीलवर हल्ला का करण्यात आला याचं अद्याप कारण स्पष्ट झालं नाही. तर, या घटनेचा कसून तपास पोलीस

करत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version