Vijay Shivtare : जन्मदात्याचं पांग फेडलं.. आमदार विजय शिवतारे यांना कन्या ममता यांनी दिली स्वतःची किडनी

विजय शिवतारे यांच्यावर 'किडनी ट्रान्सप्लांट' शस्त्रक्रिया पार पडली. यादरम्यान डॉ. ममता शिवतारे यांनी केवळ एक डॉक्टर म्हणून नव्हे, तर एक मुलगी म्हणूनही आपल्या कर्तव्याची पराकाष्ठा केली.
Vijay Shivtare : जन्मदात्याचं पांग फेडलं.. आमदार विजय शिवतारे यांना कन्या ममता यांनी दिली स्वतःची किडनी

Vijay Shivtare Kidney Transplant : बाप आणि लेकीच्या पवित्र नात्याची एक हृदयस्पर्शी घटना समोर आली असून, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांना त्यांच्या कन्या डॉ. ममता शिवतारे यांनी स्वतःची किडनी दान केली आहे. गेल्या काही काळापासून विजय शिवतारे हे किडनी निकामी झाल्यामुळे डायलिसिसवर होते आणि त्यांची प्रकृती खालावत चालली होती. अशा कठीण प्रसंगी पित्याला नवजीवन देण्यासाठी त्यांच्या कन्या ममता शिवतारे देवदूत ठरल्या. या शस्त्रक्रियेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात या बाप-लेकीच्या अतूट प्रेमाची, कर्तव्याची आणि त्यागाची चर्चा होत आहे. केवळ मुलगा घरचा वंशाचा दिवा नसून मुलगीही वंश सांभाळणारी आणि वंश फुलवणारी पणती असते, हेच या घटनेतून सिद्ध होत आहे.

मुंबईत पार पडली यशस्वी शस्त्रक्रिया
विजय शिवतारे यांच्यावर मुंबईतील एका नामांकित रुग्णालयात 'किडनी ट्रान्सप्लांट' (Kidney Transplant) शस्त्रक्रिया पार पडली. डॉ. ममता शिवतारे यांनी केवळ एक डॉक्टर म्हणून नव्हे, तर एक मुलगी म्हणूनही आपल्या कर्तव्याची पराकाष्ठा केली. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या वडील आणि मुलगी दोघांचीही प्रकृती स्थिर असून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. एका पित्याच्या हातातली आधार देणारी काठी बनलेली मुलगी पुरंदर आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरली आहे.

हेही वाचा – Maharashtra Government Decisions: सुट्टीच्या दिवशीही मंत्रालयात 'ओव्हरटाईम'!; एकाच दिवशी निघाले तब्बल 103 हून अधिक शासन निर्णय

विजय शिवतारे यांची राजकीय कारकीर्द
विजय शिवतारे, ज्यांना त्यांचे समर्थक प्रेमाने 'बापू' म्हणतात, हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत. त्यांनी 2009 आणि 2014 मध्ये पुरंदर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. जरी त्यांना 2019 च्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला, तरी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा मोठ्या मताधिक्याने निवडून आले. यापूर्वी त्यांनी राज्य सरकारमध्ये मंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली असून, त्यांच्या जनसंपर्कामुळे ते नेहमीच चर्चेत असतात.

लेकीच्या रूपाने मिळाली नवसंजीवनी
समाजात अनेकदा मुलाला प्राधान्य दिले जात असताना, ममता शिवतारे यांनी केलेल्या या कृत्याने लेकीचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. "देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही, म्हणूनच तो लेकीच्या रूपाने आपला दूत पाठवतो," अशा भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या जात आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजकीय कारकीर्दीत अडथळे येत असताना, आता मुलीने दिलेल्या या 'गिफ्ट'मुळे विजय शिवतारे पुन्हा एकदा नव्या जोमाने जनसेवेत सक्रिय होतील, अशी आशा त्यांच्या समर्थकांना आहे.

हेही वाचा – Sunetra Pawar: पालकमंत्री होताच सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय; पुण्याचे MPCB कार्यालय रातोरात बारामतीला हलवले, 'हे' कारण आलं समोर
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version