Pune Metro: मेट्रोत पावसाचं पाणी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने दिलं स्पष्टीकरण

चक्क मेट्रोमध्ये पावसाच्या पाण्याची गळती झाल्याचं दिसून आलं.
Pune Metro: मेट्रोत पावसाचं पाणी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने दिलं स्पष्टीकरण

पुणे शहर सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेलं शहर आहे.शहराचा विकास आता झपाट्याने होताना पाहायला मिळत आहे. शासनाकडून मोठ-मोठे प्रकल्प पुणे शहरासाठी सुरू आहेत. मेट्रो लाईनच्या विकासाने आता शहरातील वाहतुकीला मोठी चालना मिळाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे पुणे मेट्रोतील प्रवाशांच्या सोयी-सुविधेचा प्रश्न समोर आला आहे. कारण, चक्क मेट्रोमध्ये पावसाच्या पाण्याची गळती झाल्याचं दिसून आलं.

समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना 21 मे 2026 रोजी संध्याकाळी 6.40 वाजता लाइन-2 वरील रामवाडी स्टेशन येथे ट्रेन सेट-5 मध्ये घडली होती. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, मेट्रोमधील हे पाणी पावसाचे नव्हते, तर HVAC ड्रेन चोक झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाली. धुळीमुळे ड्रेनेज पाइपमध्ये अडथळा आल्याने एसीमधून तयार होणारे कंडेन्सेशनचे पाणी बाहेर पडू शकले नाही आणि कोचमध्ये साचले.

पुढे ते म्हणाले की, ट्रेन ऑपरेटरकडून ही बाब तात्काळ रिपोर्ट करण्यात आल्यानंतर संबंधित HVAC युनिट बंद करण्यात आले आणि स्थिती नियंत्रणात आणण्यात आली. प्रशासनाने ही घटना तांत्रिक स्वरूपाची असल्याचे सांगत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version