होर्डिंग्जच्या रुपात काळाचा घाला…

होर्डिंग्जच्या रुपात काळाचा घाला…

पुण्यातील जुना बाजार चौक येथे होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली. यावेळी सिग्नलवर उभे असलेल्या रिक्षा आणि दुचाकीवरच होर्डिंग कोसळला.

या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला तर काहीजण जखमी झालेत. होर्डिंग कोसळल्यानंतर एकच धावपळ उडाली. दुर्घटना घडल्यानंतर स्थानिकांनी धाव घेऊन जखमींना बाहेर काढलं आणि उपचारासाठी तात्काळ ससून रुग्णालयात दाखल केलं.

दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि पोलीस दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू आहे.

रेल्वेच्या जागेमध्ये होर्डिंग हटवण्याचे काम सुरू होते त्यावेळी ही दुर्घटना घडली. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप स्थानिकांनी केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version