भररस्त्यात मृतदेहावर अंत्यसंस्कार

भररस्त्यात मृतदेहावर अंत्यसंस्कार

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

पिंपरीच्या हिंजवडी परिसरातील आयटी कंपन्यांनी गजबजलेल्या रस्त्यात चक्क मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आला.

 

गवारवाडीतील 33 वर्षीय परमेश्वर गवारेंच्या मृतदेहावर भररस्त्यातच अंत्यसंस्कार विधी करण्यात आला.

 

काही वर्षांपूर्वी परिसरात स्मशानभूमी असलेल्या जागेवर आयटी पार्क उभं करण्यात आले. तसेच शासनानं ही जमिन संपादित करुन तिथं रस्ताही तयार केला.

 

त्यामुळे परिसरात अद्याप स्मशानभूमी उभी राहू शकलेली नाही.

 

अनेकदा पाठपूरावा करूनही स्मशानभूमीसाठी जागा नसल्यानं नागरिक आता थेट रस्त्यावरच अंत्यसंस्कार करत आहेत. त्यामुळे आतातरी प्रशासन जागं होणार का?

असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version