फक्त 3 महिन्यांत, डिग्री हातात; पुण्यात बोगस डिग्र्यांचा सुळसुळाट

फक्त 3 महिन्यांत, डिग्री हातात; पुण्यात बोगस डिग्र्यांचा सुळसुळाट

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

मध्य प्रदेशमधील व्यापम घोटाळा सारखा मोठा घोटाळा आता राज्यातील पुण्यात समोर आल्याचं पाहायला मिळतंय. हातात डिग्री प्राप्त करण्यासाठी साधारण 3 ते 4 वर्षांचा कालावधी लागतो. मात्र, 3 महिन्यातही डिग्री मिळू शकते. विद्येचं घर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात 35 हजारांत आणि तीही 3 महिन्यांत डिग्री विकत मिळत असल्याचे समोर आले आहे.

शिक्षणाचा सुरु असलेला हा बाजार ‘जय महाराष्ट्र’च्या कॅमेऱ्यात कैद झालाय. 35 हजार द्या आणि पदवीधर व्हा. असा प्रकार पुण्यात सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे अभ्यासक्रमासंदर्भात विचारणा केल्यावर पेपर द्यायचा नाही असं याठिकाणी बिंदास्तपणे सांगण्यात येत. त्यामुळे ‘जय महाराष्ट्र’नं उघडकीस आणलेल्या या बोगस डिग्रीच्या प्रकरणात आता सरकार काय करावाई करतं हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version