Pune Crime: पुणे पुन्हा हादरलं! आधी नसरापूर, म्हाळुंगे आता चाकण; 11 वर्षाच्या मुलीबरोबर 32 वर्षीय नराधमाने केलं गैरकृत्य

11 वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी उत्तर चाकण पोलिसांनी 32 वर्षीय परप्रांतीय आरोपीला तातडीने बेड्या ठोकल्या आहेत.
Pune Crime: पुणे पुन्हा हादरलं! आधी नसरापूर, म्हाळुंगे आता चाकण; 11 वर्षाच्या मुलीबरोबर 32 वर्षीय नराधमाने केलं गैरकृत्य

राज्यातील गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. काल नरसापूर आणि पिंपरी चिंचवडमध्ये लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. अशातच आता अत्याचाराची तिसरी घटना समोर आली आहे. चाकण जवळील बिरदवडी येथे 11 वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी उत्तर चाकण पोलिसांनी 32 वर्षीय परप्रांतीय आरोपीला तातडीने बेड्या ठोकल्या आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास पीडित 11 वर्षीय मुलगी घरात कोणी नसल्याने घराला कुलूप लावून आपल्या काकाच्या घरी जात होती. यावेळी मुलगी एकटी असल्याचे पाहून आरोपी अरुण गयाप्रसाद मिश्रा (वय 32) याने घराच्या कंपाऊंडमध्ये प्रवेश केला आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. 

मात्र, त्या चिमुकलीने अत्यंत धैर्याने तेथून पळ काढल्याने ती बजावली. मुलीने हा प्रकार आपल्या वडिलांना सांगितल्यानंतर, वडिलांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.आरोपी अरुण मिश्रा याला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दरम्याने सध्या पुण्यातील नरसापूर प्रकरण मोठ्या प्रमाणात तापले आहे. त्याचप्रमाणे म्हाळुंगे येथील चिमुकल्यावरही अत्याचार करून संपवलं आहे. अशातच आता  11 वर्षीय मुलीबरोबरही विनयभंगाची घटना घडली आहे.  या घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version