Pune Bhor Crime Update: आम्हाला न्याय द्या! चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी नसरापूर ग्रामस्थ आक्रमक, नवले पुलावर संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

आरोपीला शिक्षा होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही अशी भूमिका चिमुरडीच्या नातेवाईकांनी घेतली आहे.
Pune Bhor Crime Update: आम्हाला न्याय द्या! चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी नसरापूर ग्रामस्थ आक्रमक, नवले पुलावर संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

नसरापूर येथे चार वर्षे मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर नातेवाईक आक्रमक झाले असून त्यांनी पुण्याच्या नवले पुलावर ठिय्या मांडला आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, आरोपीला शिक्षा होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही अशी भूमिका चिमुरडीच्या नातेवाईकांनी घेतली आहे.

नवले पुलावर या चिमुरडीचे प्रेत ठेवण्यात आले असून तिला न्याय मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. आमच्यावर कितीही गुन्हे दाखल करा, पण आम्ही न्याय मिळाल्याशिवाय इथून हलणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. 

पुण्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी एका 65 वर्षीय व्यक्तीने, घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीला गोठ्यात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि तिची हत्या केली. या घटनेनंतर राज्यभर संताप व्यक्त होत असून नसरापुरातील ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केलं आहे. दरम्यान, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार असून आरोपींना कठोर शिक्षा करणार असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version