जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शिरुरमध्ये किर्तनकार बाबाजी महाराज चाळकर याला विनयभंग प्रकरणी अटक करण्यात आली.
पुणे जिल्ह्यात प्रसिध्द किर्तनकार महाराज म्हणून ओळख असलेल महाराजाने घाणेरडे कृत्य केल्याने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
बाबाजी महाराज चाळक असे या महाराजाचे नाव आहे. शिरूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथे पसायदान गुरूकूल ही ही महाराजांची अद्यातमीक शिक्षण देण्याची संस्था
आहे.
याच शिक्षण संस्थेतपवित्र ठिकाणी बाबाजी महाराज चाळक यांनी आपल्याच संस्थेत शिकणाय्रा 3 मुलींची छेडछाड केली. या तिन्ही मुली 10 ते 12 वर्ष वयोगटातील
असून या मुलीच्या नातेवाईकांनी शिरूर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केल्या नंतर शिरूर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत महाराजाला अटक केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.