Pune : हात-पाय, मानेवर गंभीर खुणा…, पुण्यात सापडला महिलेचा विवस्त्र मृतदेह; सीसीटीव्हीतून मिळाला वेगळाच निष्कर्ष

पुणे जिल्ह्यातील चाकण शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंबेठाण चौक परिसरात भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने एका महिलेवर हल्ला करून तिला ठार केल्याची घटना घडली आहे.
Pune : हात-पाय, मानेवर गंभीर खुणा…, पुण्यात सापडला महिलेचा विवस्त्र मृतदेह; सीसीटीव्हीतून मिळाला वेगळाच निष्कर्ष

पुणे जिल्ह्यातील चाकण शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंबेठाण चौक परिसरात भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने एका महिलेवर हल्ला करून तिला ठार केल्याची घटना घडली आहे. शोभा विजय वाघमारे असे मृत महिलेचे नाव असून त्या मूळच्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील रहिवासी होत्या. सध्या त्या चाकण परिसरात राहत होत्या. सोमवार, १६ मार्च रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास त्या आंबेठाण चौकाजवळील उड्डाणपुलाखालून सर्व्हिस रोडने जात असताना सुमारे सहा भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला.

हेही वाचा- Chhatrapati Sambhajinagar Crime: 50 लाखांच्या व्यवहारातून थरार! आधी खणला खड्डा, मग प्राध्यापकावर त्यांच्याच पिस्तुलातून…

सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा थरार कैद झाला असून महिलेने दगड उचलून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्र्यांच्या झुंडीपुढे त्यांचा निभाव लागला नाही. कुत्र्यांनी हात, पाय, तोंड आणि मानेवर गंभीर जखमा केल्याने अतिरक्तस्त्राव होऊन सुमारे पंधरा मिनिटांतच त्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी स्थानिकांना विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. सुरुवातीला खून किंवा अत्याचाराचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा प्रकार भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर चाकण परिसरात भटक्या कुत्र्यांची वाढती दहशत पुन्हा एकदा समोर आली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांनी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version