कोल्हापूर महापालिकेनंतर आता पुण्यातही जातवैधता प्रमाणपत्रावरुन 7 नगरसेवकांचे पद रद्द झाले आहेत.
निवडणुकीनंतर जात वैधता प्रमाणपत्र 6 महिन्यांच्या मुदतीमध्ये सादर न करणाऱ्या 7 जणांचं नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.
या शिफारसीचा अहवाल आयुक्त सौरभ राव यांनी राज्य सरकारकडे पाठवला आहे.
पद रद्द झालेल्यांपैकी 5 नगरसेवक सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे असून 2 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत.
पद रिक्त झाल्यामुळे पुढील 6 महिन्यात या जागांसाठी पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, 5 नगरसेवकांचे पद रद्द होणार असले तरी सत्ता समीकरणांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट आहे.
पद रद्द झालेल्या नगरसेवकांची नावे
भाजपाचे नगरसेवक
राष्ट्रवादी नगरसेवक
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.