गेली पूजा कुणीकडे ?

प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर संपर्कक्षेत्राबाहेर आहे. यामुळे गेली पूजा कुणीकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेली पूजा कुणीकडे ?

पुणे : प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर संपर्कक्षेत्राबाहेर आहे. यामुळे गेली पूजा कुणीकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बनावट कागदपत्र सादर करुन सरकारी योजनांचा गैरवापर करत आयएएस झाल्याचा आरोप पूजावर आहे. प्रशिक्षणार्थी आयएएस म्हणून नियुक्ती झाली असताना अधिकारांचा गैरवापर केला असाही आरोप पूजावर आहे. या प्रकरणात मसुरी येथील आयएसएस प्रशिक्षण केंद्राने पूजाला चौकशीसाठी बोलावले आहे. तसेच पूजाच्या प्रशिक्षणार्थी आयएएस म्हणून काम करण्यावर स्थगिती आणली आहे. प्रशिक्षण केंद्राने कठोर पवित्रा घेतल्यापासून पूजा खेडकर संपर्कक्षेत्राबाहेर आहे. पूजाच्या आईवर शस्त्राचा धाक दाखवून जमीन हडपल्याचा आरोप आहे तर वडिलांवर आर्थिक अफरातफर केल्याचा आरोप आहे. प्रशिक्षण केंद्राने चौकशीला हजर राहण्यासाठी दिलेली मुदत संपली तरी पूजा समोर आलेली नाही. ती अद्याप संपर्कक्षेत्राबाहेर आहे. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निर्णय

वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणानंतर,  केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निर्णय. मागील वीस वर्षात दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून, त्याचा लाभ घेतलेल्या अधिकाऱ्यांची तपासणी केली जाणार. दिव्यांग प्रमाणपत्राचा लाभ घेणाऱ्या मागील वीस वर्षातील अधिकाऱ्यांची यादी बनवण्याचे काम केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून सुरू

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version