मालेगावात कर्नाटक सरकारच्या भूमिकेचा निषेध

मालेगावात कर्नाटक सरकारच्या भूमिकेचा निषेध

कर्नाटक राज्यात सत्ताधारी भाजप सरकारने विद्यार्थीनींसाठी पोशाख तयार केला आहे. यानुसार हिजाब व बुरख्याला विरोध करत मुस्लिम विद्यार्थीनींना महाविद्यालयांमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे. सरकारच्या या भूमिकेचा निषेध करत राष्ट्रवादी विद्यार्थी सेलच्या नेतृत्वाखाली सुपर मार्केट परिसरात विद्यार्थीनींनी निदर्शने केली आहेत.

मालेगावात हिजाबविरोधातल्या निर्णयाविरुद्ध राष्ट्रवादी विद्यार्थी सेलची मालेगावात निदर्शने केली. राष्ट्रवादी काँग्रसेच्या महिला, युवती रस्त्यावर उतरल्या असून मालेगावात कर्नाटक सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला आहे.

मुस्लिम विद्यार्थिनींना प्रवेश नाकारला

कर्नाटकात हिजाब प्रकरण चांगलचे तापले असून हिजाब घातलेल्या मुलींना वेगळ्या खोलीत बसण्यात सांगितले आहे. तसेच ज्यावेळी ते ठरलेल्या पोशाखात येतील तेव्हाच त्यांना वर्गात बसवण्याची परवानगी देण्यात येईल. हिजाब घालण्याचा हट्ट धरणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारी शैक्षिणक संस्थांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version