रस्त्याच्या रखडलेल्या कामाविरोधात आंदोलन 

पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथील रस्त्याच्या रखडलेल्या कामाविरोधात आंदोलन करण्यात आलं आहे. भोर पंचायत समितीच्या माजी सभापतीने भर पावसात रस्त्याच्या मधोमध बसून आंदोलन केलं आहे.
रस्त्याच्या रखडलेल्या कामाविरोधात आंदोलन 

१७ जुलै, २०२४ पुणे : पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथील रस्त्याच्या रखडलेल्या कामाविरोधात आंदोलन करण्यात आलं आहे. भोर पंचायत समितीच्या माजी सभापतीने भर पावसात रस्त्याच्या मधोमध बसून आंदोलन केलं आहे. रस्त्याच्या मधोमध ठिय्या मांडत संबंधित ठेकेदाराविरोधात माजी सभापती लहू शेलार यांनी स्थानिकांसोबत हे आंदोलन केलं आहे. 'या ठिकाणच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे'. तसेच,'ठेकेदाराने या रस्त्याचे काम रखडवल्याने या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे' 'काही वेळा या खड्ड्यातून दुचाकी घसरून अपघातही होत आहेत', असं स्थानिकांचं म्हणणं आहे. नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने, प्रशासनासह ठेकेदाराला जागं करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version