१३ जुलै, २०२४ कोल्हापूर : कोल्हापुरात २९ जुलैपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात विशाळगड अतिक्रमण मोहीम राबविण्यात येत आहे. विशाळगडावरील अतिक्रमणासाठी हिंदुत्ववादी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. त्याचबरोबर आगामी सण उत्सव पाहता प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे. १५ जुलै ते २९ जुलै असा हा बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने हे आदेश लागू करण्यात असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. यापूर्वीचा बंदी आदेश १४ जुलै पर्यंतचा होता. त्यानंतर आता पुन्हा नव्याने बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.