कास्टिंग काऊचबद्दल देसी गर्लचे वादग्रस्त वक्तव्य

कास्टिंग काऊचबद्दल देसी गर्लचे वादग्रस्त वक्तव्य

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

हार्वी विनस्टीनच्या उघडकीस आलेल्या सेक्स स्कँडलने हॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. एका कार्यक्रमात बोलतांना देसी गर्ल प्रियांका चोप्राने याबाबत संताप व्यक्त केला आहे. यावेळी प्रियांका म्हणाली, हार्वी विनस्टीन हे केवळ हॉलिवूडमध्येच नव्हे, तर ते प्रत्येक ठिकाणी आहेत. अशा व्यक्तींमुळे करीअरची मोठी स्वप्ने पाहाणाऱ्या मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होतं.

तसेच, कास्टिंग काऊच संदर्भात हॉलिवूड सिनेनिर्माता हार्वी विनस्टीन विरोधात हॉलिवूड अभिनेत्री एंजलिना जोलीसह इतर अभिनेत्रींनीही तक्रार नोंदवली आहे. प्रियांका चोप्राने यामध्ये बॉलिवूडचा थेट उल्लेख केला नसला तरी बॉलिवूडमध्येही अभिनेत्रींचे लैंगिक शोषण होत असल्याचे संकेत प्रियांकाने दिले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version