जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
रंग उजळ नसल्याने मला हॉलिवूडचा सिनेमा मिळाला नाही, असे प्रियांकाने म्हटलयं. प्रियांकाच्या या वक्तव्यामुळे हॉलिवूडमध्ये वर्णभेद किती टोकाला गेला आहे, हे स्पष्ट होते. यासोबतच देसी गर्लने हॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेत्यांमधील मानधनाच्या तफावतीचाही मुद्दा मांडला आहे. बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाची छाप पाडणाऱ्या प्रियांकाने हॉलिवूड चित्रपट क्षेत्रीतील काळी बाजू उजेडात आणली आहे.
एका चित्रपटाच्या शुटींगसाठी मी बाहेर गेली असता मला एक फोन आला. तो फोन माझ्या एजंटने उचलला. माझी शारीरिक बनावट ठिक नसल्याने मला तो सिनेमा नाही मिळू शकत असे सांगण्यात आले. फक्त वर्णभेदामुळे मला तो सिनेमा दिला गेला नाही असे प्रियांका म्हणाली. तसेच, हॉलिवूडमध्ये एखाद्या मोठ्या अभिनेत्यासोबत अभिनेत्री काम करत असेल, तर तिला जास्त महत्त्व दिले जात नाही. असे देखील प्रियांका म्हाणाली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.