Prithviraj Chavan : "भावनिक फायदे मिळवण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ नाव" पृथ्वीराज चव्हाण यांचं वादग्रस्त विधान

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापात पृथ्वीराज चव्हाण यांनी संवाद साधत पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरार्थ केलेल्या भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर खळबळजनक विधान केलं आहे.
Prithviraj Chavan : "भावनिक फायदे मिळवण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ नाव

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापात पृथ्वीराज चव्हाण यांनी संवाद साधला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरार्थ केलेल्या भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर खळबळजनक विधान केलं आहे. ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी झालेल्या हवाई युद्धात भारताचा सपशेल पराभव झाला. अमेरिकेतील कुख्यात उद्योगपती जेफ्री एपस्टिन प्रकरणाशी संबंधित गोपनीय कागदपत्रांमुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हतबल असण्याची शक्यता असून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेली युद्धबंदी मान्य करून त्यांनी ऑपरेशन सिंदूर थांबविले, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा- Sydney Beach Shooting: सिडनी गोळीबारप्रकरणी पोलिसांचा मोठा खुलासा! आरोपीचा भारताशी संबंध? पदवीपर्यंतचे शिक्षण भारतात

तसेच भावनिक फायदे मिळवण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव देण्यात आल्याचे वादग्रस्त विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानावर लज्जास्पद म्हणत भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच युद्ध भावनांनी किंवा शब्दांनी नाही तर शस्त्रांनी जिंकता येत असं भाजपने म्हटलं आहे. यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूरमध्ये पाहिलं की, मिल्क्ट्रीची एक किलोमीटर सुद्धा हालचाल झाली नाही. दोन-तीन दिवस झाले ते फक्त हवाईयुद्ध झालं, मिसाईल युद्ध झालं आता पुढची युद्ध देखील तशीच होणार आहेत. मगं आपल्याला 12 लाख आर्मी ठेवण्याची काय गरज आहे की?” असं गंभीर वक्तव्य त्यांनी केलं आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version