भारताच्या क्रिकेट कसोटी संघाला ‘मोठा’ धक्का

भारताच्या क्रिकेट कसोटी संघाला ‘मोठा’ धक्का

भारताच्या क्रिकेट कसोटी संघाला ऑस्ट्रेलिया सोबतच्या पहिल्या कसोटीआधी मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ जखमी झाल्याने त्याची ऑस्ट्रेलिया सोबतच्या पहिल्या कसोटी संघातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलिया इलेव्हन संघासोबतच्या सरावादरम्यान झेल घेताना त्याच्या डाव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या या दुखापतीने भारतीय संघात चिंतेचं वातावरण निर्माण झाले.

पृथ्वीला पहिल्या कसोटीतून वगळण्यात आल्याचे बीसीसीआयने ट्विटमध्ये सांगितले आहे. मात्र, कसोटी मालिकेपूर्वीच पृथ्वी शॉला दुखापत झाल्याने पहिल्या कसोटीला मुकावे लागत असले तरी मालिकेमध्ये तो खेळणार की नाही हे त्याच्या रिकव्हरीवर अवलंबून आहे.

BCCI @BCCI
UPDATE – Prithvi Shaw ruled out of First Test against Australia in Adelaide.
BCCI @BCCI
Update: The medical team is assessing Prithvi Shaw at the moment. He hurt his left ankle while attempting to take a catch at the boundary ropes. Shaw is being taken to the hospital for scans #TeamIndia

403 people are talking about this

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version