खासदार प्रितम मुंडेंनी केली बीडमध्ये पाहणी; शेतीच्या बांधावर जाऊन पंचनामे करून आढावा सादर करण्याचे आदेश

खासदार प्रितम मुंडेंनी केली बीडमध्ये पाहणी; शेतीच्या बांधावर जाऊन पंचनामे करून आढावा सादर करण्याचे आदेश

जय महाराष्ट्र न्यूज, बीड

 

गारपीट आणि पावसानं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी कामाला लागलेत. पिकांसह घरांची झालेली पडझडीची पाहणी खासदार प्रीतम मुंडेंनी केलीय. त्यानुसार नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रीतम मुंडेंनी अधिकाऱ्यांना दिलेत.

पिकांबरोबर घरांचीही पडझड झाली असल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानुसार अधिकाऱ्यांनी गावस्तरवर आणि शेतीच्या बांधावर जाऊन पंचनामे करून आढावा सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत.

नुकसानीची प्रशासनानं घेतली. मात्र, हवामान विभाग अंदाजानुसार एक  दिवस अजून धोक्याची घंटा आहेत त्यामुळं याकाळात तर काही नुकसान झाले तर ती सर्व माहिती एकत्रित करून सरकार समोर मांडली जाईल असे खासदार प्रीतम मुंडे यांनी सांगितलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version