17 वर्षापासून ही अभिनेत्री मुंबईत आणि नाव मात्र बरेलीच्या मतदार यादी

17 वर्षापासून ही अभिनेत्री मुंबईत आणि नाव मात्र बरेलीच्या मतदार यादी

वृत्तसंस्था, बरेली

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा गेल्या सतरा वर्षांपासून मुंबईत राहते.मात्र, आजही उत्तरप्रदेशातील बरेलीच्या मतदार यादीत तिचं नाव असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका सर्वेक्षणादरम्यान ही माहिती समोर आली. तर यास कारणीभूत असणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करू असं आश्वासन जिल्हा निवडणूक सहाय्यक अधिकारी अभिजीत मुखर्जी यांनी म्हटलंय.

मात्र, यामुळे निवडणुक आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. 2000मध्ये मिस वर्ल्डचा खिताब पटकावल्यानंतर प्रियांका बरेलीमधून मुंबईत आली.तेव्हापासून ती इथेच वास्तव्यास आहे.तर आता बरेलीच्या मचदार यादीत देसी गर्लचे नाव आढळून आल्याने चिंता व्यक्त होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version