“ईशान्येकडील विजय बलिदान देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना समर्पित” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

“ईशान्येकडील विजय बलिदान देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना समर्पित” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

ईशान्य भारतातील विजयासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी बलिदान दिलं आहे,” असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विजय भाजप कार्यकर्त्यांना समर्पित केला आहे.

त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी भाजपच्या दिल्लीतील नव्या मुख्यालयात जाहीर सभा घेतली. आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

तसेच पंतप्रधान मोदींनी या यशाचं श्रेय देखील अमित शाह यांना देऊ केल.

”सूर्योदयावेळी सूर्याचा रंग केसरी, तर सूर्यास्तावेळी लाल रंग असतो. देशात आता केसरी रंग दिसेल,” असं म्हणत पंतप्रधान मोदींनी त्रिपुरातील विजयावर आनंद व्यक्त केला. भ्रम आणि भीती पसरवणाऱ्यांना मतदारांनीच उत्तर दिलं आहे, असं ते म्हणाले.

”ईशान्येकडील लोकांना अगोदर वाटायचं की दिल्ली आपल्यापासून दूर आहे. मात्र, भाजपने हे चित्र बदलल आहे आणि दिल्ली ईशान्येकडील लोकांच्या दारात आणली आहे,” असं देखील पंतप्रधान मोदी या वेळी म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version