‘विरोधक ना काही करणार, ना करू देणार’

‘विरोधक ना काही करणार, ना करू देणार’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली. यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवही उपस्थित होते. ही ५०८ रेल्वे स्थानकं २७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेली आहेत. तर, ४५० हून अधिक रेल्वे स्थानके राज्यांमध्ये आणि सुमारे २० केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेली आहेत.

कार्यक्रमाला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले,
‘जगातील रेल्वेचे जाळे जितके दक्षिण आफ्रिका, युक्रेन, स्वीडन, यूके यांसारख्या देशांमध्ये आहे तितके एकट्या भारताने ९ वर्षात रेल्वे ट्रॅक बांधले आहेत. लोकांचा प्रवास हा सुलभ आणि आनंददायी व्हावा हे देशाचं उद्दिष्ट आहे. या माध्यमातून प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर बसण्यासाठी उत्तम वेटिंग रूम बनवण्यात येत आहेत. तसेच, हजारो स्थानकांवर मोफत इंटरनेट उपलब्ध करण्यात येतील. विकासाच्या ध्येयाकडे वाटचाल करणारा भारत आपल्या अमृत कालावधीच्या सुरुवातीला आहे. आजपासून एक नवा अध्याय सुरू होत आहे. १३०० रेल्वे स्थानकांपैकी ५०८ अमृत भारत स्थानकांचा पुनर्विकास केला जाईल. यावर २५ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत असं पंतप्रधान म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version