पंतप्रधान मोदींनी केल्या ३ मोठ्या घोषणा

पंतप्रधान मोदींनी केल्या ३ मोठ्या घोषणा

नवी दिल्ली, २६ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : चांद्रयान – ३ चे यश साजरे करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरू येथे इसरोच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली आहे. ब्रिक्स परिषद आणि ग्रीसचा एक दिवसाचा दौरा करून पंतप्रधान थेट बंगळुरू येथे आले. इसरोच्या शास्त्रज्ञांची भेट घेऊन पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले. यानंतर शास्त्रज्ञांना उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी तीन मोठ्या घोषणा केल्या.

चांद्रयान – ३ मधून २३ ऑगस्ट रोजी विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले. या ठिकाणी उतरणारा भारत हा पहिला देश आहे. लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर आला. रोव्हरने चंद्रावर संशोधन सुरू केले आहे. या कामगिरीसाठी इसरोच्या शास्त्रज्ञांचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले. यानंतर बोलताना पंतप्रधान मोदींनी तीन मोठ्या घोषणा केल्या.

ज्या ठिकाणी विक्रम लँडर उतरले त्या जागेला आता शिवशक्ती या नावाने ओळखले जाईल, असे पंतप्रधान म्हणाले. याआधी चांद्रयान – २ ने चंद्राच्या जमिनीला जिथे स्पर्श केला त्या जागेला तिरंगा या नावाने ओळखण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. चांद्रयान – ३ ने एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या घटनेची आठवण म्हणून दरवर्षी २३ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version