19 किलोचा व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर दर घटले

नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किमतींमध्ये मोठी कपात केली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती 41 रुपयांनी कमी.
19 किलोचा व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर दर घटले

मुंबई: नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किमतींमध्ये मोठी कपात केली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती 41 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन किमती आजपासून लागू झाल्या आहेत. मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1714.50 रुपये झाली आहे. ऑयल मार्केटिंग कंपन्यांच्या या दर कपातीच्या निर्णयामुळे ढाबे, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

हेही वाचा: राज्यात रेडिरेकनर दरात सरासरी 3.53% दरवाढ

दरम्यान आजपासून म्हणजेच 1 एप्रिल 2025 पासून नवीन कर वर्ष सुरू होत आहे. दर महिन्याप्रमाणे, महिन्याच्या पहिल्या दिवसापासून देशात अनेक मोठे बदल देखील लागू केले जातील अशी चर्चा आहे, ज्याची झळ प्रत्येक कुटुंबाला आणि प्रत्येक सर्वसामान्याच्या खिशाला बसू शकते असंही बोललं जातंय. हे बदल एलपीजी सिलिंडर, तुमचे बँक खाते, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डच्या किमतींमध्ये दिसून येतील अशी शक्यता आहे. इतकेच नाही तर महामार्गावरून प्रवास करणे महाग होऊ शकते, कारण अनेक मार्गांवर टोल कर वाढणार आहे असंही बोललं जातंय. 

त्यातच आता नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किमतींमध्ये मोठी कपात केली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती 41 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन किमती आजपासून लागू झाल्या आहेत. यामुळे ढाबे, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version