आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा मोठा निर्णय जाहीर करण्यात आलं. यासोबतचं आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी काही नव्या घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या आहेत. कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात करण्याच्या निर्णयाचा प्रभाव शेयर मार्केटमध्ये दिसून आला, दोन्ही बाजारातील निर्देशांकाने चांगलीच उसळी घेतली.
अर्थमंत्र्यांचे महत्वाचे निर्णय
कॉर्पोरेट करामध्ये 34.94 टक्यावरुन आता 25.17 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सवलतींचा लाभ न घेणाऱ्या कंपन्याना 22% कॉर्पोरेट कर लागणार आहे.
सरचार्ज जोडल्यानंतर कॉर्पोरेट टॅक्स 25.17 टक्के द्यावा लागणार आहे. मिनिमम अल्टरनेटिव टॅक्स अर्थातचं मॅट 18.5 टक्क्यावरुन 15 टक्क्यावर आणून ठेवला आहे.
ऑक्टोंबर 2019 नंतर स्थापना झालेल्या कंपन्यांसाठी केवळ 17.1 टक्के एवढा कॉर्पोरेट कर असेल.या निर्णयामुळे केंद्र सरकारवर 1.45 लक्ष कोटी रुपयाचा आर्थिक बोजा पडणार आहे. शेअर विक्रीतून मिळालेल्या कॅपिटल गेनवरील सरचार्ज समाप्त करण्यात आला आहे.
सीएसआर फंडातून आता शासकीय, सार्वजनीक, पब्लिक फंडेड शिक्षण संस्थाना तशेच आयआयटींना मदत करु शकतात.