आरोग्यसेवेचा बोजवारा! ग्रामीण रुग्णालयाच्या गटाराबाजूलाच महिलेची प्रसूती

आरोग्यसेवेचा बोजवारा! ग्रामीण रुग्णालयाच्या गटाराबाजूलाच महिलेची प्रसूती

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

 

ग्रामीण रुग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालूक्यातील वरवट बकाल येथे ग्रामीण रुग्णालयाबाहेर एका गटारात महिलेची प्रसुती झाली.

 

टुनकी येथील एक महिला नातेवाईकांसह वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूती करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी आली होती. मात्र, रुग्णालयाच्या मुख्य प्रवेश द्वाराला आतून  कुलूप असल्याने आणि ड्युटीवर असलेले कर्मचारी कुंभकर्णी झोपेत असल्याने तब्बल दोन तास ही महिला रुग्णालयाच्या गेट समोर विव्हळत होती.

 

तिचा नवरा कर्मचाऱ्यांना शोधण्यासाठी धावत होता. मात्र, एकही कर्मचारी रुग्णालय परिसरात आढळून न आल्याने या आदिवासी महिलेची प्रसूती रुग्णालयाबाहेरच झाली. मात्र या घडलेल्या प्रकारनंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांना रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी अरेरावी करत धुडकावून लावलं.

 

 

दरम्यान, रुग्णालयात कर्मचारी आणि पदाधीकाऱ्यांची पद रिकामी असून वारंवार मागणी करुनही येथे गेल्या दिड ते दोन महिन्यापासून डॉक्टरच हॉस्पीटमध्ये फिरकले नसल्याचं समोर आलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version